बिग बॉस मराठीने टीआरपीच्या शर्यतीत मोठा पल्ला गाठला आहे. बिग बॉसमध्ये आजपर्यंत झालेल्या खेळांद्वारे बिग बॉसच्या घरात असणाऱ्या मोठ्या सदस्यांवर अपमानास्पद टीका केल्या जात आहे. यादरम्यान ज्या स्पर्धकांनी या मोठ्या स्पर्धकांचा अपमान केला आहे त्यांची शाळा रितेश देशमुखने चांगल्या प्रकारे घेतली आहे. निक्की आणि जान्हवी या दोघींच्या उद्धटपणावर आळा घाल्यासाठी रितेश देशमुखने कानपीळणी केली होती मात्र तरी सुद्धा जान्हवीचा तिच्या जीभेवर ताबा नसल्याच पाहायला मिळालं. नुकताच झालेला टास्क 'सत्याचा पंचनामा' या टास्टमध्ये सत्य-खोट्याच्या खेळात सदस्यांमध्ये वाद होताना दिसले. यावेळेस जान्हवीने पॅडी कांबळे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या अभिनयावर आणि करिअरवर बोलताना जान्हवी किल्लेकरने आपली मर्यादा सोडली. यावेळेस ती पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरवर अपमानास्पद टीका करत वक्तव्य झाली आहे.
यावेळेस टास्क खेळत असताना आपल्या ग्रुप पुन्हा एकदा गोत्यात येत असल्याच समजल्यावर जान्हवीची चलबिचल होण्यास सुरुवात झाली आणि त्याच रागात ती बोलली, "यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाही. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत", असं म्हणत जान्हवीने तिचा संताप व्यक्त केला. यावर प्रत्युत्तर देण्याच्या हेतूने आणि जान्हवीला तिची चूक दाखवण्यासाठी आर्या जाधव जान्हवीला जाब विचारण्यासाठी गेली आणि त्यावर जान्हवी “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही” असं म्हणतं आर्याकडे दुर्लक्ष करू लागली. यावर आर्या तिला प्रत्युत्तर देत म्हणाली, "तू जेवढं काम केलं नाहीये…तेवढी त्यांनी अॅक्टिंग केलीये. त्यांचा एक स्टेटस आहे…त्यांनी खूप काम केलंय त्यामुळे उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नकोस. इथे तू आधीच घाण करतेय पण, कोणाच्या करिअरवर केलेलं भाष्य ऐकून घेणार नाही" असं म्हणतं आर्याने जान्हवीला जाब विचारला.
याव्यतिरिक्त विशाखा सुभेदार देखील जान्हवीच्या या कृत्यावर नाराज झाल्याच त्यांनी केलेल्या एका पोस्ट दरम्यान दिसून आलं आहे.
"केहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना.." विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक. निकी बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना "जोकर "म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही. गेली अनेकं वर्ष हे कामं तो करतोय. "उथळ पाण्याला खळखळाट खूप" हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे आणि अगं ए मुली.. तुझा जन्म कदाचित 2000 तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली 1998 मध्ये. त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला.. येड्यांची जत्रा मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. जानवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाही ते.. गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाचा टाइमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही, नखाची किंमत नाहीये तुला आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय अत्तपर्यंत.. खेळ आहे खेळ आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पहिले पण तुम्ही तर थांबतच नाही आहात.. ताईंनी ग्लामर मिळवून दिल मराठी सिनेमाला... त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई... त्यांच्या दमावर त्याकाळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखण बंद करा, जरा बोलताना भान ठेवा..
विनोदा मुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, 50 शी पूर्ण झालीय त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे. तो शांत आहे ह्याचा अर्थ अस नाहीये की त्याल स्वाभिमान नाहीये..!
पॅडी माऊली तूझा खेळ तू खुप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा...! आता तर तू जोरात आलायस..! इतका हिडीस बोलल्यानंतर ही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीय त्याबद्दल तुला सलाम... खचून जाऊ नकोस...! टास्कमध्ये जोर लावून खेळ मित्रा..! तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज. एक उत्तम रिऍक्टर असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक...! बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली. काय वेळ भन्नाट. निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत.. खरंतर जा रोज जा.. आणि तीचे वाळत घातले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडा चा...!
करियर वर बोलायच नाही....